आरोस-दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
Tanvi Gosavi became the first runner-up in the “Miss Diwali” competition
आरोस-दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने “दीपोत्सव” कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “मिस दीपावली” स्पर्धेत तन्वी गोसावी हिने “बेस्ट स्माईल” सह प्रथम क्रमांकाचा किताब पटकाविला. तर द्वितीय येण्याचा मान इशा गोडकर व तृतीय क्रमांक स्नेहा शिरसाट हिने प्राप्त केला. दरम्यान “बेस्ट कॅटवॉक” जान्हवी कवठणकर, तर “बेस्ट हेअर स्टाईल” चा किताब नंदिनी बिले यांना देण्यात आला.
मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त “दीपोत्सव” कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे पहिल्या दिवशीचे उद्घाटन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, तर दुसऱ्या दिवशीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजू पांगम, दिलीप भालेकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, अमोल आरोस्कर, संजू पांगम, पोलीस पाटील चतुर मालवणकर आदी उपस्थित होते.
वेशभूषा आणि मिस दीपावली स्पर्धेचे परीक्षण प्रवीण मांजरेकर, हेमंत मराठे व कृतिका कोरगावकर यांनी केले. तर नृत्य स्पर्धांचे परीक्षण ओंकार कलामंचचे अध्यक्ष अनिकेत आसोलकर व मुंबईस्थित नृत्यदिग्दर्शक मंदार काळे यांनी केले. दरम्यान संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची शुभम धुरी यांनी पार पडली.
न्हावेली / वार्ताहर









