रांची
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका बसमध्ये आग लागल्याने दोन जणांचा होरपळून अंत झाला आहे. बसचे चालक-वाहक हे दिवाळीची पूजा केल्यावर बसमध्ये दीप प्रज्वलित करून झोपी गेले होते. या दीपामुळेच बसमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.









