प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात भातकापणीचा हंगाम सुरू होत़ो पुढे जसजसे पीक तयार होते त्याप्रमाणे भातकापणीचे काम हाती घेण्यात येत़े यावर्षी पावसाने अश्विन अखेरपर्यंत म्हणजे 25 सप्टेंबरपर्यंत पिच्छा पुरवला त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाल़ा भातपीक चांगले तयार झाले तरी पावसाच्या वक्रदृष्टीमुळे पुरेसे धान्य शेतकऱयाच्या हाती पडणे मुश्किल झाल़े
रखरखीत उन्हाचा तडाखा आणि पाठोपाठ विजांच्या कडकडाटासह पावसाची एन्ट्री साऱया शेतीवर पाणी फेरत होत़े आता हळवी आणि महान अशी सारी भातपिके एकदम कापणीस तयार आहेत. पावसामुळे उभी पिके जमिनीवर आडवी झाली आहेत… मळय़ात, खाचरात पाणी साचून आडव्या पिकांच्या लोंबीवरच नव्याने कोंब येऊ लागलेत. दाण्यांचीही गळ सुरू झालीय. परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतीची सारी वाताहात उडण्याची गंभीर स्थिती उभी केली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यासह साऱया कोकणपट्टीत बहुतांश भागात हीच विदारक स्थिती आहे. त्यामुळे बळीराजाची दिवाळी आनंदात साजरी होण्याऐवजी शेतातील कापणीच्या चिंतेत गेली आहे. पावसामुळे बळीराजाची पळापळ झाल़े. भरपूर कष्ट करून तयार झालेले पीक हाती येईल, अशी अपेक्षा असताना पावसामुळे मोठय़ा नुकसानीला तोंड द्यावे लागत आह़े पाऊस थांबल्यानंतर शेतकऱयांनी कापणीला जोरात सुरूवात केली आह़े शेतात राब-राब राबायचं आणि या पावसाने सारं धवून न्यायचं, अशावेळी शेतकऱयांनी कसं जगायचं? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत़
कृषी विभागाने शेतकऱयांना सल्ला दिला की, यावर्षी खरीपाच्या हंगामासमोर परतीच्या पावसाचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. वातावरणाचा अंदाज घेत उघडीप पाहून पिकांची कापणी करावी. कापणी केलेले पिक सुरक्षित झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. यामुळे संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते. कृषी विभागाच्या या सल्ल्याचा विचार शेतकऱयांनी केला पण त्यांच्या नशीबी आलेली धावपळ वाचू शकलेली नाह़ी
एका बाजूला हवामान बदलाचा मोठा ताण पर्यावरणावर येत असताना लहरी पावसाचा तडाखा बसत आह़े यातून दिलासा मिळण्यासाठी शासकीय व्यवस्थेने उभे राहिले पाहिजे, अशी मागणी होत आह़े शेतकऱयांच्या या नुकसानीची शासनानेही दखल घेऊन योग्य नुकसान भरपाई दय़ावी, असे आग्रहीपणे शेतकरी वर्गातून सांगितले जात आह़े शासनाने निश्चित केलेली भरपाई ही खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असत़े याला पर्याय म्हणून काही नव्या गोष्टी केल्या पाहिजेत असे मत काही शेतकऱयांनी मांडल़े
कोविड काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले, टाळेबंदीमुळे अनेकांची कामे थांबली, हातावर पोट असलेल्या लोकांना रोजच्या जेवणाची चिंता वाटू लागल़ी यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने मोफत स्वरूपात धान्य वितरण करण्याबद्दल धोरण स्विकारल़े याचा लाभ अनेक कष्टकरी लोकांना झाल़ा अलीकडेच पेंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आह़े
या पार्श्वभूमीवर शेतकऱयांना नुकसान भरपाई म्हणून मर्यादित दराने काही रक्कम देण्याऐवजी त्या शेतीतून हाती पडले असते, असे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे शेतकऱयाला मोफत स्वरूपात देण्यात याव़े म्हणजे शेतकऱयासाठी असे धान्य मिळावे, असा नवा पर्याय शेतकऱयासाठी उपलब्ध राहिल़ अतिवृष्टी, अनावृ
ष्टी, भूकंप यासह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱयांना याच स्वरूपात भरपाई दिल्यास रोख रकमेऐवजी वस्तूद्वारे शेतकऱयाला दिलासा मिळू शकेल़ लाभार्त्याला थेट रक्कम खात्यात जमा करण्याचे शासकीय धोरण असताना बाजारपेठ केंद्री व्यवस्था मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या विरोधात उभी आह़े शासकीय लोक या दबावाखाली राहण्याऐवजी शेतकऱयांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका काही शेतकऱयांनी मांडली आह़े
भारतात कृषी विमा सुरू आह़े त्यासाठी काही शासकीय धोरणदेखील ठरली आहेत़ अद्याप कृषी विमा योजना सर्वस्तरावर, सर्व पिकांसाठी सुरू नाह़ी यामुळे शेतकरी वर्ग हैराण आह़े लहरी पावसाला तेंड देण्यासाठी शेतकऱयांच्या पातळीवर कोणताही पर्याय उपलब्ध नाही, अशावेळी कृषीपिक विमा योजना त्यांना उपयोगी पडू शकत़े यासाठी सरकारने अधिक चांगल्या परताव्याची योजना मिळवून दिली पाहिज़े तरच शेतकरी वर्ग अधिक आशेने आपला व्यवसाय करू शकेल़ जागतिक पातळीवर होणारा हवामान बदलाचा त्रास कमी अधिक प्रमाणात सगळ्या ठिकाणी होत़ो तथापि समाजातील कष्टकरी वर्गाला त्याचा तडाखा अधिक मोठय़ा प्रमाणात बसत़ो शेतीच्या जोडीला अन्य उद्योग व्यवसाय धंदे असणाऱया लोकांना लहरी हवामानाचा फटका कमी प्रमाणात बसत़ो शासनाने एकमेव कृषी व्यवसाय करणाऱया लोकांना विशेष स्वरूपाची मदत दिली पाहिज़े अशी मागणी शेतकरी वर्गातून हात आह़े
अतिवृष्टी झाली केंवा दुष्काळ पडला तर राजकीय नेत्यांकडून पाहणी करण्याचे सोपस्कार पार पडले जातात़ असे सोपस्कार केल्यामुळे नेत्यांना बरेच मोठे लाभ हात असतीलही पण प्रत्येक बाधित शेतकऱयाला दिलासा †िमळेल, अशी हमी मात्र त्यातून मिळत नाह़ी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेला कोणताही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी व्यवस्था उभारली गेली पाहिज़े गरजू शेतकरी आमच्याकडे यावेत, मग आम्ही उदारपणे मदत मंजूर करावी, अशा सरंजामी वृत्तीत लोकप्रतिनीधींनी राहण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसताच लगोलग मदत देण्यासाठी सर्वेक्षण यंत्रणा कामी लागेल, याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवणे आवश्यक आह़े, अशी कोकणातील शेतकऱयांची भावना झाली आह़े सत्तेवर कोणते लोक आहेत, यापेक्षा शेतात राबणाऱया माणसाला किमान लाभासह त्याचा व्यवसाय करता येईल याकरिता काही चौकट आखून दिली जाणे आवश्यक आह़े हे काम राज्यकर्त्यांनी करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून आह़े यासाठी राजकीय नेतृत्वाने पुरेशी इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.
सुकांत चक्रदेव








