सिवान / वृत्तसंस्था
ज्येष्ठ सीपीआय नेते आणि बिहार विधान परिषदेचे सदस्य केदारनाथ पांडे यांचे सोमवारी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केदारनाथ पांडे यांच्या निधनावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. दिवाळीदरम्यानच बिहारच्या राजकारणासाठी दुःखद बातमी आली आहे. पांडे यांच्या निधनाची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षक संघात शोककळा पसरली होती. ते सारण शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते.
केदारनाथ पांडे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता येथे उपचार सुरू होते. याचदरम्यान रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. या धक्क्यातून त्यांना वाचवता आले नाही.









