वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी नेस्ले इंडियाने डायरेक्ट टू कंझ्युमर (डीटूसी) हा नवा प्लॅटफॉर्म सादर केला असून दररोजच्या लागणाऱया वस्तूंची मागणी ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरती नोंदविता येणार आहे. नेस्ले इंडियाने यासंबंधीची घोषणा नुकतीच केली आहे.
‘माय नेस्ले’ नावाने सुरू करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ दिल्ली एनसीआरमध्ये सर्वप्रथम केला जाणार आहे आणि त्यानंतर इतर शहरांमध्ये प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी दिली आहे.

डीटूसीच्या माध्यमातून कंपनी पहिल्यांदाच ऑनलाईन व्यवसायामध्ये पाय ठेवले आहेत. ग्राहकांच्या दैनंदिन गरजांची मागणी लक्षात घेऊन सदरचा प्लॅटफॉर्म खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. ‘माय नेस्ले’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना खरेदीचा आनंद उपभोगता येणार आहे. वैयक्तिक भेटवस्तू सवलतीसह विविध योजनांचा लाभ ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरती मिळू शकणार आहे.
इतरांकडून होतोय प्लॅटफॉर्मचा वापर
अलीकडच्या काळामध्ये विविध एफएमसीजी कंपन्यांनी वरील प्लॅटफॉर्मचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन पोर्टलचाही लाभ कंपन्या मिळवून घेत आहेत.









