वार्ताहर /लाटंबार्से
लतांबारसे ग्रामसभा विविध प्रश्नांनी गाजली गेली. पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेत घेतलेल्या ठरवांचे वाचन करण्यात आले. या ग्रामसभेत पूर्वीच्या ग्रामसभेप्रमाणे आर जीचे अनिश नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आतापर्यंत या ग्रामसभेत ग्रामस्था?ची मोठय़ा प्रमाणात उपस्थित होती. खास करून तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. शंभर लोकांच्या बसण्याची व्यवस्था असलेला सभागृह काही लोकांना उभे तर बाहेरही मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. फार उशिरापर्यंत चाललेली ग्रामसभा आणि काही समित्या न नेमल्याने पुढे कामे कशी होईल या अनिश नाईक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरपंच पद्माकर मलिक यांना ही ग्रामसभा तहकूब करावी लागली तसेच काही दिवसांनंतर फक्त समित्या नेमणुकी संदर्भात नवीन ग्रामसभा घेण्याचा ठराव घेण्यात आला.
नानोडा येथील पूजा गेस्ट हाऊस ओहलावरून लहान पुलाचे काम चालू आहे या कामासाठी पंचायतीने ना हरकत दाखला दिलेला आहे हा प्रश्न ग्रामस्था?समोर ठेवण्यात आला त्यावेळी ग्रामस्था?चा या कामासाठी जोरदार विरोध तर हे काम वळणावर असल्याने अपघात होण्याची शक्मयता असून, यासाठी लागणारे तांत्रिक अहवाल मिळाला आहे का? अटी आणि नियम पाळले आहेत का? त्यावर पंचायतीने सांगितले की सदरचे काम मुख्य रस्त्याला जोडून नसल्याने तसेच सर्व कायदेशिर बाबी तपासून तसेच मालकाने विविध खात्यांच्या परवानगी मिळवल्या असून पंचायतीकडे मोठी फाईल जमा केली आहे. सदर बांधकाम आणि रस्ता यामध्ये मोठे अंतर असल्याचे पंचायतीने सांगितले.
पंचायतीक्मया वॉर्ड क्रमांक सहा मध्ये असलेला बेकायदेशीर भंगार अड्डा आणि पंचायत परिसरातील सर्व बेकायदेशीर भंगार अड्डे बंद करण्यात यावे. यदा कदाचित कोणाच्या नजरेस भंगार अड्डा व्यवसाय नजरेस आल्यास पंचायतीला कळविणे असा ठराव घेण्यात आला. परिसरातील मंदिरातील फंड पेटी फोडण्याचे सत्र चालू असून काही महिन्यांपूर्वी भटवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरातील फंड पेटी फोडण्यात आली होती. तसेच घरमालकाने एखाद्या भाडेकरूना ठेवताना शक्मयतो त्याच्याकडून सर्व माहिती गोळय़ा केल्याशिवाय त्यांना न ठेवण्यात यावे त्याचबरोबर पंचायत सदस्यांची ही नैतिक जवाबदारी असून प्रत्येक वॉड क्मया पंचायत सदस्याने याकडे करडी नजर ठेवून भाडेकरूंची माहिती पंचायतीला द्यावी. या प्रश्नाला लाडफे ग्रामस्थ निवृत्त पोलिस अधिकारी विष्णू मलिक पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले की पूर्वी एक हवालदार व एक पोलिस अशा भाडे करुंची यादी तसेच माहिती गोलाकरण्यासाठी नेमणूक करण्यात येत होती व त्यांची यावर कडक नजर असायची व ते प्रत्येक घरात जावून भाडेकरूंची यादी जमा करून देत होते तशी नेमणूक करावी आज अशी परिस्थिती आहे की गावात बाहेरच्या लोकांनी याठिकाणी जास्त प्रमाणात जागा विकत घेतल्या असून गोव्याबहेरील लोकांना जागा विकत देताना किंवा त्यांना ना हरकत दाखला देताना पंचायतीने विचार करावा जेणेकरून उद्या आम्हालाच गाव सोडून जावे लागेल लोकप्रतिनिधीही त्यांचेच असू शकेल. अशा लोकांना या ठिकाणी थारा देवू नये.
लतंबर से औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीसाठी 80 टक्के गावच्या लोकांना नोकऱया देण्यात याव्यात त्यासाठी कुशल कामगार मिळत नसल्यास अकुशल कामगार साठी प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच औद्योगिक वसाहतीत भूखंड विक्री करताना गोमंतक लोकांचा विचार करावा.
वडावल येथे शाळकरी मुलांसाठी कदंब बस सेवा सुरू करावी हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर एक ग्रामस्थ उभा राहिला शाळकरी लोकांसाठी तर वयस्कर लोकांसाठी ही कदंब बस सेवा सुरू करावी त्यावर विरोध करताना काही ग्रामस्था?नी उत्तर देवून नजरेस आणून दिले की बस यापूर्वी सुरू करण्यात आली होती परंतु काही मोजके लोकांशिवाय कोणाचं लोक या गाडीत चढत नसल्याने सदर कदंब बस बंद करण्यात आली. प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन असल्याचेही पंचायतीच्या नजरेस आणून दिले बस सेवा वडावल येथे सुरू पाहिजे असल्यास ग्रामस्था?च्या सहीचे एक अतिरिक्त निवेदन पांचायातीकडे सादर करावे तसेच सही घेताना ते निवेदन कशासाठी आहे ते लोकांना वाचून दाखवावे आणि मगच सह्या घ्याव्यात जबरदस्त करून सह्या घेण्यात येवू नयेत तसेच कदंब बस सुरू झाल्यास ती सतत चालू असायला पाहिजे. असा ठरावही घेण्यात आला. वडावल येथे नवीन बस स्थानक सुरू करण्यात यावा असा ठरावही घेण्यात आला.
परिसरात बेवारस कुत्री आणि गुरांचा संहार जास्त प्रमाणात असून रात्रीच्या वेळी या बेवारस गुरे तसेच कुत्री रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात अपघात होवू शकतात. रस्त्यावर घण करून ठेवतात चालताही येतं नाही असा प्रश्न विष्णू मलिक यांनी मांडला यांचा बंदोबस्त करावा त्यावर अशा प्रकारच्या बेवारस गुरांची माहिती गो शाळेला देण्यात येणार असून त्यांची रवानगी गो शाळेत करण्यात येणार आहे. परिसरातीलसार्वजनिक स्थळांचे संवर्धन आणि जतन आणि चागल्या उपयोगात आणण्यासाठी नवीन समिती नेमण्यात आली.
अधाक्ष्य म्हणून सत्यवान मलिक, सचिव – रामचंद्र नाईक (शासकीय सेवक), शुभांगी परवार, पूजा घाडी, लक्ष्मण परवार आणि अनिश नाईक यांची सदस्यपदी म्हणून नेमणूक करण्यात आली.
कचरा गोळा करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे का? असा प्रश्न ग्रामस्था?नी उपस्थित केला हल्ली कोण येतं नाही यापूर्वी कचरा पेटय़ा त्या त्या परिसरात ठवण्यात येत होत्या पण काही ग्रामस्थ ओला कचरा त्यावर टाकत असल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. कचरा गोळा शुल्क म्हणून प्रत्येक घरापासून महिना तीस रुपये म्हणजे दिवसा एक रुपये शुल्क आकारण्यात यावा काहींनी याला विरोध केला तर काहींनी मान्य असल्याचे कळविले. तर ओला कचरा गोळा करण्यासाठी नवीन उपाययोजना शोधण्यात येणार असल्याचे पंचायतीने कळविले. तर औद्योगिक वसाहतीमध्ये मेगा प्रकल्पासाठी चा ठराव ग्रामस्था?समोर पुढे ठेवण्यात आला त्या ठ रवला ग्रामस्था?नी तीव्र विरोध केला.
नरेगा अंतर्गत नवीन योजनाची माहिती सचिवांनी दिली. परंतु जमीन मालकाकडून ना हरकत दाखला महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्था?कडून आलेल्या अर्जांचे वाचन करण्यात आले. अनिश नाईक यांनी पंचायातीकडे आतापर्यंत फंड किती आहे. पंचायतीने आकडेवारीनुसार अनिश ला माहिती पुरविली. पंचायत परिसरात महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बांधण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्या संदर्भात फाईल पोहचिवण्यात आली आहे.
नवनिर्वाचित वॉर्ड क्रमांक पाच ची सदस्य हर्षदा परवर यांनी आपली ओळख करून द्यावी तसेच कासरपा ल हरिजन वाडा येथील वाडय़ावर फेरी मारून लोकांची विचारपूस करावी आणि आतापर्यंत कुठले ठराव घातले असल्याचे ग्रामस्थ लक्ष्मण परवार यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना पंच हर्षदा परवा र यांनी सांगितले की मी नुकतीच निवडून आली असून यापुढे प्रत्येक घरात जावून नवीन योजना किंवा कामाची नोंद केली जाईल. क्रशरवल्यांकडून कर आकारणी चालू आहे का? न असल्यास त्यांना कर बसवावा असा ठराव घेण्यात आला.
यावेळी आर जिचे अनिश नाईक यांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले की आतापर्यंत ग्रामसभेत उपस्थिती असलेल्या लोकांची आकडेवारी लक्षात घेता कधीच समाधानकारक राहिली नसून ग्रामसभेचे महत्व लोकांना यावे यासाठी तुम्ही काय करीत आहे त्यावर पंचायतीने सांगितले की ग्रामसभा असल्याचे दोन पेपरमध्ये प्रसिद्ध केले असून महत्वाच्या ठिकाणी ग्रामसभा असल्याची सूचना लावण्यात आल्या आहेत. यापुढे ध्वनी योजनेद्वारे गावात ग्रामसभेची माहिती देण्यात यावी जेणेकरून ग्रामसभेचे महत्व् लोकांना माहिती पडेल व आकडेवारी वाढू शकेल. असा ठराव संमत करण्यात आला. यावेळी उपसरपंच त्रिशा राणे, नीलम कारा पूरक र, दिलीप वरक, कृष्णा आरोलकर, हर्षदा पर वार, पूजा घाडी, नरेश गावस, डॉ. रामा गावकर आदी पंच सदस्य उपस्थित होते. निरीक्षक म्हणून भालचंद्र बिर्जे यांनी काम पाहिले तर आभार प्रदर्शन नरेश गावस यांनी केले.









