मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी उशिरा पार पडली सभा
सातारा/प्रतिनिधी
सातारा पालिकेच्या (satara municipal corporation) कामकाज समितीची सभा पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात (Standing Committee Hall) शुक्रवारी सायंकाळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तब्बल १४२ विषयांना मंजुरी सर्व उपस्थित खाते प्रमुखांनी दिली. हद्द वाढ झालेल्या भागातील विकास कामाच्या मंजुरीची विषयाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हद्दवाढ भागावर ही मुख्याधिकारी अभिजत बापट (Municipal Commissioner Abhijeet Bapat) यांचे विशेष लक्ष आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कामकाज समितीच्या सभेला अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, पाणी पुरवठा अभियंता शहाजी वाठारे, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, वसुली विभाग प्रमुख प्रशांत खटावकर, शहर विकासचे साखरे, विद्युत अभियंता सावळकर, अतुल दिसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सभेत तब्बल १४२ विषय अजेंड्यावर होते. त्यात सोनगाव कचरा डेपो येथील कचरा डोझरद्वारे कपिंग करण्याच्या १० लाखाच्या कामास मंजुरी देण्यात आली.
आकाशी स्वच्छताग्रह बांधण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मागणी करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचा विषय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या अमृत ग्रीन झोन अंतर्गत महादरे आणि हत्ती तलाव विकसित करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. टाकाऊपासून टिकाऊ या अंतर्गत विषय घेतला. ग्रेड सेपरेटर सुशोभित करण्यासाठी सुमारे ८ लाखाच्या कामास मंजुरी देण्यात आली. फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्याचे काम पहिल्या संस्थेकडून रद्द करून दुसऱ्या संस्थेला देण्याचा विषय मंजूर करण्यात आला, आदी विषय मंजूर करण्यात आले