प्रतिनिधी / बेळगाव : नशेत विष पिऊन पतीने जीवन संपविल्यानंतर आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा गळा घोटून पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्युवंटमुरी येथे घडली आहे. या संबंधी काकती पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वासंती होळयाप्पा मस्ती (वय 25) असे ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी वासंतीने आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा गळादाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून रात्री एफआयआय दाखल करण्यात आले आहे.