The Vanchit Bahujan Aghadi should ask the superintendent about the inconvenience in the girls’ hostel
सावंतवाडी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीना सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या व गैरसोयीची माहिती वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर आणि जिल्हा कार्यालयीन सचिव सिताराम उर्फ संदीप जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ याबाबत विद्यार्थिनीच्या उपस्थितीत वसतिगृहाचे अधिक्षक श्री. इंदलकर यांना जाब विचारला. यावेळी श्री. इंदलकर यांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करून सर्व समस्या सोडविण्यासह इतर गैरसोय दुर करण्याची ग्वाही दिली.
यावेळी महेश परुळेकर आणि संदीप जाधव मुलींना मिळणारे जेवण, नाष्टा, थंड व गरम पाण्याची व्यवस्था, खिडक्या दरवाजांसह इतर सर्व समस्या तसेच भाजीपाला, चिकन, अंडी, दूध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनाकडून कमी प्रमाणातील अन्न घटक याबाबत श्री. इंदलकर यांना जाब विचारला.
दरम्यान या वसतिगृहातील विद्यार्थिनीना सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्यासह गैरसोयीची येत्या आठ दिवसात पूर्तता न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. इंदलकर यांना महेश परुळेकर आणि संदीप जाधव यांनी दिला.
ओटवणे / प्रतिनिधी









