Samarjitsinh Ghatge vs Hasan Mushrif : गोरगरीब सामान्य जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी मी गेली ३५ वर्षे कार्यरत आहे.राज्यात पुन्हा सत्ता आल्यास अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार आहे.अजून दोन विधानसभा निवडणुका लढणार आहे.तसेच खासदारही होणार आहे आणि केंद्रात मंत्रीही होणार आहे.विधानसभा निवडणूक मी ७५ हजार विक्रमी मतांनी जिंकणार आहे,असा आत्मविश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर विरोधकांनी टिका करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वेळा आमदार,खासदार- माजी मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भांडवलदार प्रवृती असल्याची टीका त्य़ांनी केली आहे. आज कोल्हापुरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले, खयाली पुलाव खाणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. पुढचे दोन आमदार कोण निवडून द्यायचे हे जनता ठरवेल. मात्र कागलच्या जनतेच्या मताचे मालक हे भांडवलदार स्वत:ला समजत आहेत. दोन विधानसभा निवडणुका लढणार आहे. तसेच खासदारही होणार आहे आणि केंद्रात मंत्रीही होणार अस त्यांनी आत्ताच ठरवून टाकलं.असे वक्तव्य म्हणजे भांडवलदार प्रवृतीचे उदाहरण. हा भांडवलदाराचा पुरावा आहे.प्रत्येक भांडवलदाराला असेच वाटते की पुढील पंचवीस वर्षे माझी सेटलमेंट आहे.पण जनतेचा आशीर्वाद मलाच मिळणार आहे. त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळणार आहे.माझा जनतेवर विश्वास आहे.त्यांनी पुढील 5 वर्ष मला संधी द्यावी असं आवाहन यावेळी त्यांनी केले.
Previous Articleकुंकळ्ळी येथे 24 पासून कालीमाता पूजनोत्सव
Next Article पुलाची शिरोलीत विजेच्या धक्क्याने मजूर जागीच ठार









