व्यापारी संकुलाशेजारी मंदिरसमोरील जागेत अतिक्रमण केल्याने कारवाई : मनपा अधिकाऱयांशी महिलांची हुज्जत
प्रतिनिधी / बेळगाव
गोवावेस परिसरात महापालिकेच्या मालकीची जागा असून व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. व्यापारी संकुलाशेजारील मंदिरसमोरील जागेत अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी सकाळी मनपाकडून करण्यात आली. यावेळी अतिक्रमण हटविण्यास आक्षेप घेण्यात आला. पण पोलीस संरक्षणात सदर अतिक्रमण हटविण्यात आले.

गोवावेस परिसरातील बसवेश्वर चौकाच्या सभोवती महापालिकेच्या मालकीची जागा आहे. जलतरण तलाव, पेट्रोलपंपची जागा, व्यापारी संकुल तसेच विस्थापितांना देण्यात आलेले गाळे असलेली जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या ठिकाणी विस्थापितांना दिलेल्या व्यापारी संकुलाशेजारी सिद्धिविनायक मंदिर आहे. मंदिरालगत असलेल्या खुल्या जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. यापूर्वी येथे लहान आकाराचे शेड होते. मात्र त्याच शेडच्या ठिकाणी आता मोठय़ा आकाराची इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी स्क्रॅपचा अड्डा चालविला जातो.
वेळोवेळी सूचना देऊनही दखल न घेतल्याने कार्यवाही
महापालिकेच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने अतिक्रमण हटविण्याची सूचना केली होती.
वादावादी…!
- मनपाचे अधिकारी व इमारत मालकाच्या कुटुंबीयांमध्ये वादावादी
- सकाळी 8 पासून सुरू केलेली मोहीम सायंकाळी 6 पर्यंत सुरूच
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस फौजफाटा तैनात









