देवघरात वापरल्या जाणाऱ्या कापरामुळे एक मानसिक शांती मिळते.त्याचबरोबर एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण हाच कापूर अनेक औषधांच्या निर्मितीसाठी देखील वापरला जातो.याबरोबरच नैसर्गिक कापूर अनेक रोगांवरदेखील फायदेशीर ठरतो. हाच नैसर्गिक कापूर म्हणजे भीमसेनी कापूर म्हणून ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊयात नैसर्गिक कापराचे फायदे काय आहेत.
१. भाजले असल्यास कापूर किंवा कापराचे तेल लावा यामुळे जळजळ दूर होईल
२. घरात कापूरचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही.
३. दात दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्वरित आराम मिळेल
४. घरात सुगंध दरवळत राहावा यासाठी रूम फ्रेशनर्स ऐवजी कापूर वापरा कापराची वडी जाणून ठेवल्याने घरामध्ये सुवास पसरेल
५. पोट दुखी मध्ये ओवा आणि पुदिना कापूर यांचे तीन थेंब टाकल्यास पोटदुखी बंद होते
६.स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश करावे त्यामुळे वेदना थांबतील आणि आराम मिळेल
७.कान दुखत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे कोमट करून कानात टाकावा
८.केसात कोंडा झाल्यास आवळ्याच्या तेलात कापूर मिसळून डोक्याला लावा
९. पायांच्या भेगा कमी करण्यासाठी गरम पाण्यात थोडेसा कापूर टाकावा आणि त्यामध्ये थोडावेळ पाय ठेवावेत त्यानंतर स्क्रब करून मॉइश्चराईस क्रीम लावा पायांच्या भेगांची समस्या दूर होते.
१०.ऑलिव्ह ऑइल मध्ये कापूर मिसळून डोक्याची मालिश करावी त्यामुळे स्ट्रेस आणि डोकेदुखी कमी होईल
(टीप : कोणत्याही उपचारपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Previous Articleदहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार
Next Article शाब्बास! वर्णेतील अनुष्काची कुवेतमध्ये सुवर्ण दौड









