गोवावेस येथील मनपाच्या जागेमध्ये झालेले अतिक्रमण मनपाने सकाळी हटवले. प्रचंड फौज फट्यात मनपाने जागा ताब्यात घेतली. जागा मनपाच्या मालकीच्या आहे, मात्र एक कुटुंब वास्तव्यास होते. मनपाने सूचना करूनही जागा रिक्त केली नाही. त्या कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने स्थगिती दिली नाही.
दरम्यान, सदर कुटुंब समोरील बाजूस वास्तव्य करून मागील बाजूस भंगार खरेदी करण्याचा व्यवसाय करत होते. मनपा आणि आज पोलिसांच्या मदतीने जागा ताब्यात घेतली आहे.