वाळवा : वाळवा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागनाथ किसनगावडे रा. काळमवाडी यांच्या शेतात बसण्यासाठी असलेल्या संदिप विरकर रा. नेर्ले यांच्या मेंढ्यावर केलेल्या हल्ल्यात ८ मेंढ्याठार झाल्या असून सुमारे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नागनाथ किसनगावडे यांच्या माणिकवाडी रस्त्यालगत सुळकीच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतात गेल्या तीन दिवसापासून बसण्यासाठी संदिप विरकर यांच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या. मात्र काल मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ८ मेंढ्या ठार झाल्या आहेत. या परिसरात दोन– तीन कुटुंब वास्तव्यास असून जवळच डोंगराळभाग व ऊसशेती असलेने बिबट्याचा वावर नित्याचाच झाला आहे. मात्र या गावात एवढ्यामोठ्या प्रमाणात हल्ला होण्याची हि पहिलीच वेळ आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहितीमिळताच पोलीस पाटील संगीता वारे यांनी वनविभागास कळविले वनपाल सुरेश चरपाले व वनरक्षक अधिकारीदीपाली सागावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन विजय सावंत, रवींद्र सावंत, दिलीप वारे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. कासेगाव परिसरातील गावामध्ये गेल्या दहादिवसात झालेला हा तिसरा हल्ला असून येवलेवाडी पाठोपाठ बिबट्याने आपला मोर्चा शेजारीचअसणाऱ्या काळमवाडी गावाकडे वळवला असल्याचे दिसत आहे. जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले वन विभागाच्याअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना बिबट्यापासूनसंरक्षणासाठी आवश्यक माहिती व सूचना दिल्या मात्र बिबट्याच्याहल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous ArticleRatnagiri : परतीच्या पावसाने शृंगारतळी बाजारपेठेत घुसले पाणी
Next Article Kolhapur : भाजप आणि शिंदे गटाची दिवाळीत बैठक








