प्रतिनिधी / मडगाव
भारतातील सर्वात मोठे इंधन वितरण स्टार्ट-अप, इंधन मित्र (इलत्ँल्ddब्) ने गोव्यात काल सोमवारपासून आपली सेवा सुरू केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा मडगावात झाला.
इंधन मित्र ने गोव्यातील ऑपरेशन्सद्वारे स्थानिकांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मासळीचे ट्रॉलर, शेतकरी, रेस्टॉरंट, निवासी सोसायटय़ा आणि इतर उद्योगांना त्याच्या दैनंदिन व्यवहारात इंधन घरोघरी पोहोचवण्याची सेवा कालपासून गोव्यात सुरू झाली.
कोणताही इच्छुक ग्राहक ‘इलत्ँल्ddब्’ ऍपवरून थेट इंधन ऑर्डर करू शकतो आणि किमान ऑर्डर व्हॉल्यूम 20 लिटर इतकी कमी ठेवण्यात आली आहे. इंधन वापरणारे त्यांच्या मोबाईलवरून इंधन खरेदी करू शकतात आणि ऑर्डर दिल्यानंतर 3-4 तासांच्या आत इच्छित प्रमाणात त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी ते उलपब्ध केले जाणार आहे.
‘इलत्ँल्ddब्’ मुळे गोव्यातील व्यापारीवर्गाची चांगली सोय होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. इंधन मित्र (‘इलत्ँल्ddब्’) या सारख्या विस्तारीत स्टार्टअप्समुळे, डिजिटल इंडियाचा दृष्टीकोन लवकरच प्रतयक्षात येईल. इंधनाच्या घरोघरी वितरणाची कल्पना स्वतःच क्रांतिकारी आहे. नियमित इंधनाची मागणी असलेल्या गोव्यातील अनेक उद्योगांची चांगली सोय आणि बचतीची क्षमता वाढेल, असे मुख्यमंत्री यावेळी पुढे बोलताना म्हणाले.
‘इलत्ँल्ddब्’ ऍप्सद्वारे संसाधनांची उलपब्धता व्यवसायांना विवेकपूर्ण बनविण्यास आणि अधिक उत्पादकता वाढविण्यास मदत करेल. गोव्यासारख्या राज्यात पर्यटन आणि आदरातिथ्य केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी कॅफे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चौवीस तास चालू ठेवण्यासाठी इंधनाची गरज कायम आहे. ही गरज आत्ता इंधन मित्रद्वारे पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
इंधन मित्रचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मल्होत्रा म्हणाले, ‘इलत्ँल्ddब्’ ऍप्सद्वारे दिल्लीसारख्या छोटय़ा ठिकाणी आपले कार्य सुरू केले होते. आता 120 हून अधिक शहरांमध्ये सेवांचा विस्तार झालेला आहे. या यादीत गोव्याची भर पडलेली आहे. संस्थेने आजपर्यंत जवळपास 8 कोटी लिटर इंधन आपल्या क्लायंटच्या नेटवर्कला वितरित केले आहे आणि दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. वितरण प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, वापरकर्ता आपली ऑर्डर त्याच्या दारात पोहोचेपर्यंत ट्रक करू शकतो. वापरकर्त्याच्या सोयीनुसार ऍपवर अनेक पेमेंट गेटवे सेट केले गेले आहेत. याशिवाय खरेदीदार इंधनाची गुणवत्ता तपासू शकतो.
या कार्यक्रमाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर व माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते. दामू नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले.









