काँग्रेस अध्यक्ष पदासाठी 18 जणांनी बजावला मतदानाच हक्क
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सोमवारी मुंबई येथील टिळक भवनात मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कोल्हपूर जिह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर आदी 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे व शशी थरुर यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूर जिह्यातून अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी विद्यमान आमदारांसह 18 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पदसिद्ध प्रतिनिधी- आमदार सतेज पाटील, सचिन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी – आमदार पी.एन.पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, निलेश उर्फ विश्वनाथ जाधव-सरनाईक, पंडीत नलवडे, तौफिक मुल्लाणी, सूर्यकांत पाटील, यशवंत हाप्पे, संग्राम नलवडे, गोपाळराव पाटील, गुलाबराव घोरपडे, सागर चव्हाण यांनी मतदान केले.