नवी दिल्ली : भारतामध्ये 2,060 नवीन कोव्हिड-१९ ची प्रकरणे नोंदवली गेली असून त्यांची संख्या आता 4,46,30,888 वर पोहोचली आहे. तर 10 जणांच्या मृत्यूमुळे कोव्हिड मृत्यूची संख्या 5,28,905 वर पोहोचली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकुण 26,834 सक्रिय प्रकरणे असून एकूण संक्रमणांपैकी 0.06 टक्के आहेत.
24 तासांच्या कालावधीत कोविड-19 सक्रिय प्रकरणांमध्ये 209 प्रकरणांची नव्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. तर आणखी 10 लोकांच्या मृत्यूंमुळे मृतांची संख्या 5,28,905 च्यावर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवरीनुसार दैनिक सकारात्मकता दर 1.86 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 1.02 टक्के नोंदवला गेला आहे. कोव्हीड-१९ या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,40,75,149 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









