Enthusiastic response to book exhibition at Vengurle City Library
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती म्हणून लाभलेले एक वैज्ञानिक होते. त्यांनी ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रातून आपला जीवनपट उलगडला आहे. सामान्य माणूस अभ्यासाद्वारे असामान्य होवू शकतो. याची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्वातून समाजाप्रती दिसते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करतो. भारतीयांनी वाचनाची प्रेरणा घेऊन साक्षर व सुंदर भारत बनवावा हीच या दिवसाची अपेक्षा आहे. असे प्रतिपादन साप्ताहिक किरात च्या संपादक सौ.सीमा मराठे यांनी नगर वाचनालयाच्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
दि. 15 ऑक्टोबर हा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेतर्फे सन 2021-2022 या आर्थिक वर्षात संस्थेने खरेदी केलेल्या व दात्यांकडून देणगी मिळालेल्या पुस्तकांचे प्रदर्शन शनिवार व रविवारी आयोजित करण्यात आले होते. साप्ताहिक किरातच्या संपादिका सौ. सीमा मराठे, यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरात वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, उपकार्यवाह सौ. माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, ग्रंथपाल गुरूदास मळीक, कर्मचारी किशोर सावंत आदींचा समावेश होता.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









