Awarded to Santosh Vaiz
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी च्या बालवाडी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या विभागातून संस्थेतर्फे पहिलाच उपक्रमशील शिक्षक म्हणून आज श्री संतोष सिताराम वैज सहाय्यक शिक्षक कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांना आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर यांचे व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पै यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर उपाध्यक्ष श्री मोहन वाडकर संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टरश्री प्रसाद नार्वेकर संचालिका श्रीमती श्रद्धा नाईक संचालक श्री गौरांग चिटणीस कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नारायण मानकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत उपस्थित होते त्यावेळी बालवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना श्री संतोष वैज सर म्हणाले हा पुरस्कार संस्थेने जरी मला दिला तरी याचे श्रेय माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाते यावेळी त्यांनी शाळेतील आजी-माजी शिक्षकांचा आवर्जून उल्लेख केला तसेच मला मिळालेल्या पुरस्कारामध्ये शाळेचे आजी-माजी विद्यार्थी शाळेचे पालक शाळेचे हितचिंतक व मित्रपरिवार यांचाही वाटा आहे असे म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळा यांचे आभार मानले.









