वृत्तसंस्था/ कोलंबो
2022 क्रिकेट हंगामातील लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला 6 डिसेंबरपासून प्रारंभ होईल, अशी घोषणा लंकन क्रिकेट मंडळाने केली. श्रीलंकेत ही स्पर्धा तिसऱयांदा भरविली जात आहे.
लंकेतील या राष्ट्रीय टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेला अव्वल स्थान मिळाले आहे. लंका प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा तीन ठिकाणी खेळविली जाणार आहे. स्पर्धेतील सामने राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा, राजसिंगे प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम, कँडी, आणि पल्लीकेली क्रिकेट स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहेत. हंबनटोटातील स्टेडियममध्ये या स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर या स्पर्धेतील सामने कँडीमध्ये होतील तर स्पर्धेतील शेवटच्या फेरीतील सामने त्याचप्रमाणे एलिमिनेटर फेरी व अंतिम सामना कोलंबोच्या पल्लीकेली स्टेडियमवर आयोजित केला आहे. सदर स्पर्धा गेल्या जुलैमध्ये घेण्याचे ठरले होते. पण लंकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती.









