उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात मल्होत्रा आडनावाचा एक परिवार आहे. या परिवारात सलग चार पिढय़ा पुरुष प्रसूतीतज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) जन्माला आल्या आहेत. प्रसूती करण्याचे काम सहसा महिलांकडे असते. त्यामुळे सहसा महिलाच प्रसूतीतज्ञ होतात. गर्भवती महिलांना पुरुष प्रसूतीतज्ञाकडून आपली तपासणी करून घेणे संकोचाचे वाटते. त्यामुळे पुरुष प्रसूतीतज्ञांची संख्या तशी कमीच असते. पण या कुटुंबाने सलग चार पिढय़ा पुरुष प्रसूतीतज्ञ देशाला दिले आहेत. या परंपरेचा प्रारंभ रावबहाद्दूर डॉ. एस. एन. मल्होत्रा यांच्यापासून झाला. त्यांनी 1921 मध्ये लाहोर मेडिकल कॉलेजमधून प्रसूती शास्त्र विषयात एमबीबीएस केले. नंतर सिमला येथे प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांचे पुत्र आर. एस. मल्होत्रा यांनीही प्रसूती शास्त्र विषयातच एमबीबीएस करून तोच व्यवसाय पुढे चालविला. त्यानंतर त्यांचे पुत्र आर. एम. मल्होत्रा यांनी जयपूर वैद्यकीय महाविद्यालयातून याच विषयात पदवी घेऊन आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर नरेंद्र मल्होत्रा आणि त्यांची पत्नी जयदीपा मल्होत्रा यांनी याच विषयात पदवी घेऊन आपला व्यवसाय पुढे चालविला. त्यानंतर आता डॉ. केशव मल्होत्रा हे नरेंद्र मल्होत्रांचे पुत्र प्रसूती शास्त्र याच विषयातील तज्ञ बनले आहेत. त्यांच्या भगिनी निहारिका मल्हौत्रा याही प्रसूती तज्ञ आहेत. प्रारंभीच्या काळात आपल्याकडून तपासणी करून घेण्यात आणि बाळंतपण करून घेण्यात महिलांना संकोच वाटत असे. तथापि, आता आपल्या कौशल्यामुळे आणि प्रॅक्टिस करत असताना आपण पाळत असलेल्या शिष्टाचारांमुळे महिलांचा संकोच दूर झाला असून मोठय़ा संख्येने महिला आमच्या रुग्णालयात येत आहेत, असे डॉ. केशव मल्होत्रा म्हणतात.
Previous Articleलडाखची मक्सूमा विराटची चाहती
Next Article विमान रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









