प्रतिनिधी / सातारा :
Dengue, malaria epidemic in Satara city सातारा शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सदृश्य साथरोग परिस्थिती सदरबाजार येथील कुपर कॉलनी, जरंडेश्वर नाका, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडीसह नकाशपुरा, मंगळवार पेठेतील काही भागात उदभवली आहे. या अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असून, खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल तर पालिकेचा आरोग्य विभाग निद्रीस्त असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. माजी नगरसेवकांनी अनेकदा फोन करुनही आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड हे फोन उचलत नाहीत. नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक मिलिंद काकडे, विशाल जाधव हे त्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करणार आहेत.
पावसाने थोडीशी उघडीप दिली की, पाणी साठून राहणाऱ्या भागात डास उत्पत्ती केंदे बनतात. त्यामुळे साथरोगजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये सातारा शहरात सदरबाजार परिसरात लक्ष्मी टेकडी, कुपर कॉलनी, प्रसाद कॉलनी, म्हाडा कॉलनी, जयजवानी हौसिंग सोसायटी, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडी, भिमाबाई आंबेडकरनगर, समता कॉलनी, लॅन्ड रेकॉर्ड कॉलनी आदी भागात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून धुर फरावणी केली नाही. त्याच बरोबर शहरातील मंगळवार पेठ, नकाशपुरा आदी भागातही पालिकेच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी साथरोगजन्य परिस्थिती उदभवली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये साथजन्य रोगाने आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये कूपर कॉलनीतील सोमण, जरंडेश्वर नाका येथील केशव कॉम्प्लेक्स येथील गायकवाड, सैनिकनगर येथील काहीजण आजारी आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सतत माजी नगरसेवकांकडे नागरिक तक्रार करत आहेत.
अधिक वाचा : मेडिकल कॉलेज उभारणीस खो घालणे चुकीचे : आ. शिवेंद्रसिंहराजे
आरोग्य विभाग कोणतीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. साथरोगाने अनेकजण आजारी आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही जण उपचार घेऊन घरी आले आहेत.