Reading Inspiration Day celebrated in Gavankar College
देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी रामेश्वरी बोरडेकर तसेच करीना शेट्ये या विद्यार्थिनींनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केली..कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य यशोधन गवस यांनी ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचार प्रेरणेतून आपण गेलो तर आपण सुद्धा नवनवीन दिशा व उद्दिष्टे प्राप्त करू शकतो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक व्यक्ती देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो तर आपण सुद्धा अशा प्रकारची जिद्द बाळगली तर तुमची पाहिलेली स्वप्नपूर्ती पण होऊ शकते अब्दुल कलाम यांचे प्रेरणा खरोखरच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार काढले.. यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक साईप्रसाद पंडित व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी साहिल सावंत यांनी केले..
सावंतवाडी/ प्रतिनिधी-









