वृत्तसंस्था/ सॅन दियागो (अमेरिका)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या सॅन दियागो महिलांच्या आंतरराष्ट्रीय खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने एकेरीत विजयी सलामी देताना झेंग क्वीनवेनचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील झालेल्या यापूर्वीच्या ओस्ट्राव्हा टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर स्वायटेकचा हा पहिला सामना होता. एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने झेंग क्वीनवेनचा 6-4, 4-6, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत स्वायटेकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या आठव्या मानांकित कोको गॉफशी होणार आहे. अमेरिकेच्या गॉफने बियान्का अँड्रीस्क्यूचा 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.









