Diwali of milk producers will be harvest!
कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध उत्पादक संघाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा दूध उत्पादकांना दिवाळी दसरा बोनस कोटीच्या घरात गेला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 124 दूध संघ कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघाला दररोज दूध वितरित करतात .जवळपास 22 हजार लिटर दररोज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दूध गोकुळला संकलित होत आहे या 22000 लिटर दूध उत्पादनातून एक कोटी नऊ लाख 90 हजार 777 रुपये एवढा बोनस सिंधुदुर्ग जिल्हा बँक खाते दूध उत्पादक संस्थांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यामुळे यंदा कोटीच्या घरात बोनसची रक्कम गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे .आतापर्यंतच्या कालावधीत यंदाच दुधामागे एक कोटी रुपये बोनसची रक्कम गेलेली ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन वाढीत आता अग्रेसर ठरत आहे .दुधाची धवल क्रांती आता गावागावात सुरू झाली आहे
सावंतवाडी / प्रतिनिधी









