हजारो कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी शुक्रवारी रवाना होणार
खानापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कन्याकुमारी ते काश्मीर या मार्गावर सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेत खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर तुमकूरजवळ यात्रेत सहभागी झाल्या असून, त्यावेळी राहुल गांधी व सोनिया गांधांबरोबर पदयात्रा करीत आहेत. ही पदयात्रा तुमकूरमार्गे बळ्ळारी, रायचूर येथून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यात्रेत रोज 25 कि. मी. चालावे लागत आहे. कर्नाटकातील संपूर्ण पदयात्रेत आमदार निंबाळकरांचा सहभाग राहणार आहे. तालुक्मयातील चार हजारहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवार दि. 14 रोजी पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
परिवहनच्या पन्नासहून अधिक बस व खासगी वाहनांची सोय केली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वा. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियोजित बसमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.









