Jayant Patil vs BJP Kolhapur News : निवडणूक आयोगाला खोटी शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाने ठाकरे गटावर केल्यानंतर आज कोल्हापुरात मुंबई क्राईम ब्रांचचे पथक दाखल होत तपास सुरु केला आहे. यावरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तसेच शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सत्तेविना भाजप राहू शकत नाही म्हणून पडेल ती किंमत देऊन भाजपने शिवसेना फोडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कोणावर तरी खापर फोडायचे म्हणून राष्ट्रवादीच नावं घेतलं जातंय. शिवसेनेच्या आमदारांनी माझं नेहमी स्वागतच केलं आहे. प्रोफेशनली आपल्याला टिकायचा असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीच नावं घेतलं जातंय.सत्तेविना भाजप राहू शकत नाही म्हणून पडेल ती किंमत देऊन भाजपने शिवसेना फोडली,शिवसेना फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचंच आहे असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या घरातली शिवसेना चोरीला गेली आता ती कुणाच्या घरात सापडेल हे थोड्या दिवसात कळेल. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला अशी टीका नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची चाचणी होणार
शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणित होती.शिवसेना फोडण्यात भाजप हात आहे हे यातून स्पष्ट होतयं. बाळासाहेबांचं नाव शिंदे यांना मिळालं यावरूनच किती मेनू प्लेटेडपणे काम चाललंय हे दिसतयं असेही ते म्हणाले. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड भेद वापरून फोडणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला. या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम जर हे करत असतील तर जनतेला हे सगळ कळतयं असा इशाराही दिला.
मशाल वर घेतलेल्या आक्षेपाबद्दल मला माहिती नाही
निवडणूक आयोगाकडून उध्दव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले मात्र समता पार्टीकडून मशाल चिन्हावर दावा ठोकण्यात आला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, मशाल वर घेतलेल्या आक्षेपाबद्दल मला माहिती नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे, रस्ते वीज पाणी नैसर्गिक संसाधने कमी पडू लागली आहेत. सर्वांचे एकमत करून यावर निर्णय घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. मात्र शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना जन्म दिला आहे. त्यामुळे शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेला अशा भावना व्यक्त करायला परवानगी दिली पाहिजे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले याविषयी बोलताना ते म्हणाले, काल ढगफुटीमुळे लोकांच्या पिकाचं आणि शेतीचे नुकसान झालंय, सरकारने तातडीने मदत करावी असी मागणीही जयंत पाटलांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








