सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पीएफएमएस प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशनचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व सार्वजनिक शौचालया या विकास कामांचा व वैयक्तिक शौचालयाचा प्रोत्साहन निधी लाभार्थींना वेळेत व तात्काळ वितरित होण्यासाठी पीएफएमएस प्रणालीचा वापर करण्यात यावा, यावर मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले कि, केंद्र शासनाच्या सर्व योजनांना पीएफएमएस प्रणाली लागू झालेली आहे. ही प्रणाली हि आनलाईन आसलेने सहा.लेखाधिकारी यांनी अत्यंत काळजी पुर्वक निधी वर्ग करावा. या प्रक्रियेत कोणतीहि हालगर्जी करु नये, जेणे करुन अनुदान हे नेमक्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. यावेळी असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी केले.
केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा निधी यापुढे पीएफएमएस प्रणालीद्वारे गावाच्या व वैयक्तिक लाभांच्या लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतील लेखा अधिकारी गट संसाधन केंद्राचे अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते. राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशनचे सिंगल नोडल अकाउंट तयार केले असून त्यामधून सर्व निधी जिल्हा पंचायत समिती व गाव स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. हा निधी वेळेत वितरित होण्यासाठी पी एम एस प्रणालीची अंमलबजावणी सर्व स्तरावर केली जाणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये लेखाधिकारी सुनील जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग केदार डोंबे, स्वच्छता विभाग राजेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी चितलांगे, नोडल अधिकारी बिराजदार व निकम यांनी खाते हाताळणे बाबत मार्गदर्शन केले उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती सुषमा देसाई, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता किरण सायमोते आदी मान्यवर उपस्थित होते. अजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षणासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी अल्पना बंगाळे, जिल्हा सल्लागार धनाजी पाटील, संजय पवार, रवींद्र सोनवणे, ऋषिकेश शीलवंत, नीलिमा सन्मुख, गणेश चव्हाण, विक्रम गाडगे, सचिन जाधव उपस्थित होते









