कोलकाता
पश्चिम बंगालमधील नादिया जिह्यात एका बांगलादेशी तस्कराला बीएसएफ जवानांनी गोळय़ा घालून ठार केले. रविवारी रात्री सीमेजवळ 15-20 बांगलादेशी तस्करांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी घेरले. याचदरम्यान संबंधित तस्करांनी धारदार शस्त्रे आणि काठय़ांनी जवानांवर हल्ला केला. तस्करांना घाबरवण्यासाठी सैनिकांनी सुरुवातीला हवेत गोळीबार केला. मात्र तस्करांच्या टोळीने प्रतिहल्ला केला. याचदरम्यान जवानांनी गोळीबार करत एका तस्कराला जखमी केले. जखमी तस्कराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.









