10 कोटी रुपयांपर्यंतचे मिळणार कर्ज
नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांमध्ये सरकारकडून स्टार्ट अप सुरू करण्याकरिता भरीव अशी मदत केली जात आहे. या मदतीमुळेच आतापर्यंत 100 स्टार्ट अप कंपन्या युनिकॉर्न बनल्या आहेत. 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असणाऱया कंपन्यांना युनिकॉर्न हा दर्जा दिला जातो.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून (डीपीआयआयटी)स्टार्ट अपना आगामी काळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एका ठराविक अवधीसाठी कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. गँरटीविना 10 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज स्टार्ट अपना मिळू शकणार असल्याची माहिती सरकारच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर देशातील स्टार्ट अप कंपन्यांना निधी उभारणीसाठी मोठी मदत होणार आहे. कर्जाच्या माध्यमातून स्टार्ट अप कंपन्या आपला व्यवसाय उत्तमपणे करू शकणार आहेत.









