वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अब्जाधिश उद्योगपती गौतम अदानी यांनी आता आपले लक्ष जयप्रकाश सिमेंट उद्योगावर केंद्रित केले असून आगामी काळात ही कंपनीही आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा असल्याचे समजते.
यासंबंधात अदानी समूहाची जयप्रकाश सिमेंटसोबत प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार जयप्रकाश सिमेंट उद्योगाचे अधिग्रहण करण्यासाठी 5 हजार कोटी रुपये मोजणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र या आठवडय़ात केली जाणार असून सध्या चर्चा सुरू असून कदाचित या प्रक्रियेला वेळही लागू शकतो. अलीकडेच अदानी समूहाने
अंबुजा व एसीसी सिमेंटचे अधिग्रहण केले आहे. यायोगे आता सिमेंट उत्पादन क्षेत्रात अदानी समूह भारतात सिमेंट उत्पादनात दुसऱया स्थानी राहिली
आहे.
कर्जात कंपनी
जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड ही सध्या कर्जाच्या संकटात असल्याचे समजते. ही बाब लक्षात घेत अदानी समूहाने यांचा सिमेंट उद्योगाचा ताबा मिळवण्यासाठी धडपड चालवल्याचे सांगण्यात येते.









