भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीयाने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे.धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो.क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवल्यानंतर धोनी आता फिल्म इंडस्ट्रीत पदापर्ण करणार आहे. त्याने पत्नीच्या मदतीने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे.’धोनी एंटरटेनमेंट’ या नावाने ते चालणार आहे. लेट्स सिनेमाने ट्विटरवर याबाबात माहिती दिली आहे. धोनीने दक्षिणेत आपली फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरु केल्य़ाची माहिती दिली आहे.
लेट्स सिनेमाने ट्विटरवर म्हटले आहे की,
महेंद्रसिंग धोनी याने दक्षिणेत धोनी एंटरटेनमेंट लॉन्च केली आहे.यामध्ये तामिळ,तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट बनवले जाणार आहेत.धोनी एंटरटेनमेंट ही माही आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या मालकीची असेल.या प्रॉडक्शन हाऊसचा प्रमुख म्हणून विकास हसिजा यांची निवड करण्यात आली आहे. माहीच्या प्रोडक्शन हाऊसने आत्तापर्यंत Roar of the Lion, Blaze to Glory आणि The Hidden Hindu सारख्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे.माही तामिळनाडू राज्यात खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याच्या फिल्ममध्ये थलपथी विजय,धनुष,सुरिया,ज्युनियर एनटीआर,राम चरण,अल्लू अर्जुन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धोनीने 15 ऑगस्ट 2022 रोजी निवृत्ती घेतली
एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती जाहीर केली. माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. याशिवाय धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला आयपीएलमध्ये चार विजेतेपद मिळवून दिले आहे. आता आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई कशी कामगिरी करते हे पाहणे मनोरंजक असेल.