ऑनलाईन टीम/तरुण
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ (Dhanushyaban)हे चिन्हंही गोठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली यावेळी उद्धव ठाकरे खूप भावुक झाले होते व त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना भावूक होताना पहिल्यांदाच पाहिलं आहे, असे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंदारे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह गोठवल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. तसेच नावही वापरण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पक्षाचे नवीन नाव पक्षचिन्ह ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काल दुपारी मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे खूप भावुक झाले होते व त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना भावूक होताना पहिल्यांदाच पाहिल्याचं, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले. ते ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत (mahaprabodhan yatra) ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, ही शिंदे शाही नाही तर इतिहासात तुमचे नाव मुघलशाही म्हणून प्रसिद्ध होईल. कारण मुघलांनी आपल्या वडिलांचा खून केला आणि गादीवर बसला, हिंदूंमध्ये असा एकही राजा नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे ६ वर्षांसाठी मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. जर देवेंद्र फडणवीस यांचा जप केला नाही तर ते एकदा माईक खेचला आता खुर्ची खेचतील,असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगवला.