ऑनलाईन टीम/ तरुण भारत
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे नावही वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) ४० बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ४० डोक्याच्या रावणानं प्रभु रामाचं शिवधनुष्य गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचं इकडे कामच नाही. उलट्या काळजावाल्याचं काम नाही. अशी काही माणसं आणि त्यांची माणसं फिरतात, त्याचा राग येतो. ज्या शिवसेनेनं (Shivsena) तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवेसनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. यामुळे शिवसेनेत मोठा हलकल्लोळ माजलाय. मात्र, अशा परिस्थितीतही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संमय राखण्याचं आवाहन केलं आहे. सध्या दिवस आणि रात्री दोन्ही वैऱ्याची आहे. त्यामुळे जागे राहा. पण शांत राहा. आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हे ही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
मी डरणारा नाही. जनता जो फैसला करेल तो मला मान्य आहे. प्रत्येक शिवसैनिक राबत आहे. तुम्हीच सर्वोच्च आहात. लोकशाहीत जनताजनार्दन श्रेष्ठ आहेत. लोकदरबाकरात मला जायचं आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर चिन्ह आणि नाव द्यावं. आपण आधीच निवडणूक आयोगाकडे आपले पर्याय सोपवले आहेत. निवडणूक आयोगाने ते जाहीरही केले. शिंदे गटाचे अद्यापही पर्याय निवडणूक आयोगाने जाहीर केले नाहीत, याचा अर्थ त्यांनी अजूनही नाव आणि चिन्हासाठी पर्याय सुचवलेले नाहीत. परंतु, निवडणूक आय़ोगाने याबाबत लवकरात लवक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना प्रमुखांचा पूत्र मुख्यमंत्री पदी नको हा हट्ट असू शकतो. पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत. शिवतीर्थावर पारंपरिक दसरा मेळावा होऊ नये म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केले. न्यायदेवता देवता या शब्दाला जागली आणि न्याय मिळाला. दसरा मेळावा अभूतपूर्व आणि अद्भूत झाला. दोन मेळावे झाले असं म्हणतात. पण मी आपल्या मेळाव्याला गेलो होतो. दुसरा मेळावा पंचतारांकित होता. पण आपला मेळाव्यात दिव्यांग होते, अंध होते. कसलीही सोय नव्हती. गाड्या नव्हत्या. अधरी भाकरी खाईन, उपाशी राहीन पण माझ्या शिवसेनेसाठी काहीही करेन, असं म्हणत अनेकजण शीवतीर्थावर आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद. ही परंपरा कालपर्वाची नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे आभार मानले.
उद्धव ठाकरे कोण, उद्धव बाळासाहेब ठाकरे. (Balasaheb Thackeray) म्हणून मला किंमत आहे. या पक्षाचं प्रमुखपद स्विकारलं तेव्हा काही आठवणी दाटल्य होत्या. १९ जून १९६६ हा शिवेसनेचा स्थापना दिन. शिवाजी पार्कचं घर आताच्या भाषेत वन बीएचकेमध्ये एकत्रित कुटुंब राहायचं. घरी मराठी माणसांची वर्दळ सुरू असायची. मार्मिकमधून शिवसेनाप्रमुख मराठी भाषिकांच्या होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यास सुरुवात केली. आजोबांनी विचारलं, एवढी गर्दी जमते, पुढे संघटना वगैरे काढणार आहेस की नाही. बाळासाहेबांनी लगेच होकार सांगितला. पण नाव काय ठरवलंस. तेव्हा शिवसेना हे नाव ठरवलं आजोबांनी सुचवलं. त्यानंतर हा संघर्ष सुरू झाला. हा इतिहास सुरू झाला. त्यावेळी कोणीही सोबत नव्हतं. पण गोरगरीब माणसं जिद्दीने आणि चिकाटीने उभी होती.
पुढे ते म्हणाले की, आज कोजागिरी आहे. आपण म्हणतो की रात्र वैराची आहे. पण सध्या दिवस-रात्र दोन्ही वैराची आहेत. त्यामुळे झोपू नका, शांत राहा, आत्मविश्वासाने मोठी लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेन, मी प्रत्येक लढाईला सामोरा गेलेलो आहे. ही लढाईसुद्धा जिंकायची आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात येऊन मी सूचना करत होतो. माझ्या सूचनांचं पालन करून आपण कोरोना काळावर मात केली. संवाद सुरू असताना अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातील एक झालेले आहात. म्हणून मी आजही माझ्या कुटुंबाशी मनमोकळे करायला आलेलो आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तो शिवप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदी नको म्हणून काहीजणांनी आपल्याशी गद्दारी केली तेव्हा. त्यावेळी मी वर्षा या शासकीय निवासस्थानाचा त्याग केला. आता त्याला दोन-तीन महिने झाले. मुख्यमंत्री पद ज्यांना पाहिजे होतं, त्यांनी ते घेतलं. ते घेऊनसुद्धा त्यांच्यात धुसफूस होते. नाराज असलेले गेले, आपण काही बोललो नाही अशातला भाग नाही, पण आपण सहन केलं. आता मात्र अती व्हायला लागलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी आजच्या संवादादरम्यान केला.
एकदा दत्ता साळवी आमच्या दारात हजर झाला. मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत सामील होत असल्याचं त्यानं आम्हाला कळवलं. त्यावेळी नगरसेवक, महापौर, आमदार खासदारकी नव्हती. आपल्या भविष्याचं काय हणार, याचा विचार न करता, मराठी माणसाच्या विचारासाठी हा माणूस काहीतरी करू इच्छितो माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य मी बजावणार, असं अनेकांना वाटत होतं. तिथून सुरुवात झाली. ठाणे पालिकेची निवडणूक आली. पहिलं यश शिवसेनेला ठाण्याने दिलं. वसंतराव मराठे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. सतीश प्रधानसह अनेकजण आले. श्रमले, मेहनत केली त्यातून शिवेसनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. मुंबई पालिका आली. त्यातून शिवसेनेचे ४२ निवडून आले. काही वेळेला संकटं आली. प्रत्येक संकटात जीवाची बाजू लावून शिवसैनिक लढत राहिला. अनेकजण असे आहेत ज्यांनी जीवसुद्धा गमावले आहेत. तुरुंगवास भोगला, पोलिसांचा अत्याचार सहन केला. हे करत करत मोडेने पण वाकणार नाही. ही भावना बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या धमन्यांमध्ये रुजवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.