प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरालगतच्या मिरजोळे घवाळवाडी येथील जंगलमय भागात बेपत्ता असलेल्या प्रौढांचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी 11.45 च्या सुमारास निदर्शनास आली. मोहम्मद हनीफ फकीर मोहम्मद पावसकर (55, ऱा मिरजोळे हनुमाननगर) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद पावसकर हा 23 सप्टेंबरपासून बेपत्ता होत़ा या प्रकरणी त्याची पत्नी जरिना पावसकर हिने शहर पोलिसांत खबर दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांकडून मोहम्मद याचा शोध घेण्यात येत होत़ा दरम्यान रविवारी सकाळी मिरजोळे घवाळवाडी येथील जंगलमय भागात मृतदेह पडून असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आह़े त्यानुसार या घटनेची खबर शहर पोलिसांना देण्यात आल़ी.
पोलिसांकडून मृतदेहाची पाहणी करण्यात आली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होत़ा मृताच्या अंगावरील कपड्याच्या आधारे नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात आल़ी यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आल़ा तसेच शहर पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तर पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत़.
हे ही वाचा : जाकादेवी-खालगाव येथील तरुणीची गळफासाने आत्महत्या
मागील काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आह़े. स्वप्नाली सावंत व मुबईतील व्यापारी खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेल़ा तसेच नुकतेच रत्नदुर्ग किल्ला परिसरात विवाहित महिलेचा मृतदेहही आढळून आला होत़ा. तर आता मिरजोळे घवाळवाडी येथे मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आह़े.