इचलकरंजी/प्रतिनिधी
तारदाळ ( ता. हातकणंगले ) येथील श्रीरामनगरामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याने राहत्या घराच्या वाश्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. नामदेव अर्जुन खोत ( वय ५२) असे त्यांचे नाव आहे. यांची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
मृत नामदेव खोत आणि त्यांची पत्नी असे दोघेच राहतात. त्यांची पत्नी मुलीकडे परगावी गेली होती. त्यामुळे खोत एकटेच घरी होते. त्यांनी घरी कोणीही नाही. हे पाहून शनिवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांने आत्महत्या का केली यांचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत समजू शकले नाही.








