Fashion Tips : आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि स्टायलिश राहायला आवडते. यासाठी स्त्रीया अनेक रूपये पार्लरसाठी खर्च करताता. स्किनपासून हेअरपर्यंत प्रत्येक गोष्ट चांगली दिसण्यासाठी प्रयत्न करतात. जर तुम्हाला सुंदर दिसायच असेल तर तुमच्या भुवया यात मोठी भूमिका बजावतात. काळ्या आणि जाड भुवया चेहऱ्याचा एकंदरीत लूक सुंदर आणि आकर्षक बनवू शकतात. आजकाल जाड आणि दाट भुवयांची फॅशन आहे. पण . बर्याच महिलांच्या भुवया पातळ असतात. यामुळे त्या नेहमी त्रस्त असतात. अनेक प्रयत्न करूनही त्याचा फारसा फरक जाणवत नाही. यासाठी मेकअप हा एकमेव पर्याय उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही भुवया हायलाइट करून चेहरा सुंदर बनवू शकता. यासाठी काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
पातळ भुवया हायलाइट करण्यासाठी या स्टेप फाॅलो करा
स्टेप 1: जर तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या पातळ किंवा हलक्या असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुमच्या चेहऱ्यानुसार भुवयांना आकार द्या. तुम्ही भुवया हायलाइट करण्यासाठी जेल बेसचा वापर करा. यामुळे तुमच्या भुवया अगदी नैसर्गिक दिसतील.
स्टेप 2 : भुवयांवर जेल पावडर लावल्यानंतर दोन्ही बाजूंनी कन्सीलरच्या मदतीने भुवया हायलाइट करा. भुवयांच्या दोन्ही बाजूंना कन्सीलर लावल्याने तुमच्या भुवयांचा आकार खूपच आकर्षक आणि हायलाइट होईल. भुवयांचा लूक वाढवण्यासाठी तुमच्या आयब्रोच्या कमानीवर जेल किंवा पावडर हायलाइटर लावा. ज्यामुळे भुवया सुंदर दिसतील.
स्टेप 3 : भुवया हायलाइट करण्यासाठी जेल पावडर लावल्यानंतर आयब्रो ब्रशच्या मदतीने भुवया चांगल्या प्रकारे ब्रश करा. जेणेकरून अतिरिक्त जेल काढून टाकले जाईल आणि भुवया अगदी नैसर्गिक दिसतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असली तर ब्यूटीशनचा सल्ला घ्या.
Previous Articleआता प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन
Next Article इंग्लंडच्या शिष्टमंडळाची कार्ला नगरीला भेट









