संघाच्या पोशाखात डॉ.मुख्यमंत्री सावंत यांचा सहभाग
प्रतिनिधी /सांखळी
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेले ’दसरा संचलन’ उत्साहात पार पडले. यंदा सांखळी येथे या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलन मिरवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही या संचलनात उत्साहात सहभागी झाले होते.
सांखळी येथील रवींद्र भवनाकडे संघाच्या ध्वजाला प्रणाम व प्रार्थनेने संचलनाला सुरुवात झाली. रवींद्र भवनकडून गोकुळवाडामार्गे पुलाकडून बाजारातून श्री राधाकृष्ण मंदिराजवळ येताच संचलनाचा समारोप झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनिमित्त दरवषी विजयादशमीला डिचोलीत संचलन करण्यात येते. यंदा प्रथमच सांखळीत संचलन झाले.
मुख्यमंत्री संघाच्या पोषाखात
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संघाचे स्वयंसेवक. खाकी पॅन्ट, सफेद शर्ट आणि डोक्मयावर टोपी असा संघाचा वेष परिधान आणि दांडा घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संचलन मिरवणुकीत सहभागी झाले होते. अन्य स्वयंसेवकांसह त्यांनीही पाऊण तास संचलन केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संचलनाचे महत्त्व विषद करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.









