21 ऑक्टोबर होणार प्रदर्शित
अमेझॉन प्राइम ओरिजिनलची सर्वात बोल्ड वेबसीरिज ‘फोर मोर शॉट्स प्लीज’चा तीसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये पुन्हा एकदा सयानी गुप्ता, कीर्ति कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू यांच्या मैत्रीत बोल्डनेस आणि ड्रामा दिसून येईल. फोर मोर शॉट्स प्लीज सीझन 3 आता 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या वेबसीरिजची तुलना हॉलिवूडची वेबसीरिज ‘सेक्स अँड द सिटी’सोबत केली जाते.

फोर मोर शॉट्स प्लीज आतापर्यंतची सर्वात यशस्वी आणि भारतीय सीरिज मानण्यात येते. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये मोठी प्रसिद्धी मिळविली होती. पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर दुसरा सीझन 2020 मध्ये झळकला होता.
अमेझॉन प्राइमची ही वेबसीरिज 4 मैत्रिणींची कहाणी आहे. या मैत्रिणी स्वतःच्या अटींवर जीवन जगू इच्छितात आणि संकटकाळात परस्परांना साथ देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या सीरिजच्या पहिल्या अन् दुसऱया सीझनचे दिग्दर्शन अनु मेनन आणि नुपुर अस्थाना यांनी केले होते. तर तिसऱया सीझनचे दिग्दर्शन जोएता यांच्याकडून करण्यात आले आहे.









