Bhajani Buwa Sudhir Sawant Honored at Adarsh Village Ker
महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कारप्राप्त केर गावात झालेला सन्मान हा माझ्या संगीत क्षेत्रातील अविस्मरणीय क्षण जो नेहमी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध भजनीबुवा सुधीर सावंतबुवा यांनी व्यक्त केले. शिवाय गोव्यातील नामवंत कलाकार पांडुरंग राऊळ, नाना शिरगावकर यांच्याकडून आपण भजनाचे धडे घेतल्याचे श्री सावंत यांनी आवर्जून सांगितले.
केर चव्हाटा मंदिर येथे आयोजित एका नवरात्रौत्सव विशेष कार्यक्रमात दोडामार्ग (सावंतवाडा) श्री. सावंत यांचा सांगितीक सेवेबद्दल अनन्य सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंचसेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, जेष्ठ ग्रामस्थ तुकाराम देसाई, शिवराम देसाई, गोपाळ देसाई, नारायण देसाई, विष्णू देसाई, अनाजी खानोलकर, सखाराम देसाई आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. सावंत हे गेल्या अनेक वर्षापासून भजन क्षेत्रात लौकिकप्राप्त भजनी गायक कलाकार आहेत ते श्री राष्ट्रोळी दत्त भजन मंडळ दोडामार्ग सावंतवाडा मधून संगीत सेवा देत असतात. जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक प्राप्त तसेच गोव्यातही प्रसिद्ध कलाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
दोडामार्ग – प्रतिनिधी