रत्नागिरी प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील विलवडे येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेले दोन दिवस कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळून रेल्वे मार्गावर आली. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील दरड बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वे बसला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यामुळे रेल्वे दोन तास उशिराने धावली.









