बेळगाव प्रतिनिधी – मानवी जीवनात नियमित व्यवहारात खाद्यपदार्थांमध्ये गाई किंवा म्हैस यांच्या दुधाची मागणी प्रामुख्याने सर्वाधिक प्रमाणात आहे. शेतकरी शेती उद्योगाला जोडधंदा म्हणून म्हैस व गाय पाळण्याचे काम करतात. या म्हैशींचे दूध नियमितपणे काढून बाजारात ते विक्री केली जाते. व आपली आर्थिक गरज पूर्ण केली जाते.बेळगाव शहरात दसऱ्या दिवशी म्हैस स्वच्छ धुवून शर्यत लावली जाते. हि परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांपासून गवळी गल्लीत जोपासली जात आहे. ही शर्यत पाहण्यासाठी तालुक्यातून गवळी समाजाचे लोक एकत्र येतात. व हा आनंद उत्सव साजरा करतात. नियमितपणे ज्या ग्राहकांना दूध विक्री केली जाते अशा ग्राहकांच्या घरासमोर जाऊन म्हैस नमस्कार करते. ग्राहक आनंदाने या म्हैशीला भेटवस्तू देतात. गवळी समाजातील लोक आपल्या मनोरंजनाचे साधन म्हणून या शर्यतीचे आयोजन करतात. प्रत्येक वर्षी या शर्यतीमध्ये अनेक लोक सहभाग घेत असतात.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









