ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्या बदलती जीवनशैली कामाच्या आणि खाण्याच्या वेळा या सगळ्यांमध्ये बदल झाला आहे. त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो. त्यामुले कोलेस्ट्रोलचा त्रास सुद्धा होतो लेमनग्रास ही कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मनाली जाते. लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे, तिचा सुगंध लिंबासारखा असतो, त्यामुळे त्याला लेमनग्रास म्हणतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम लेमनग्रास मध्ये मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. लेमनग्रासमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात. हे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढाच नाही तर लेमनग्रास तणाव, चिंता कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लेमनग्रास कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊ.
दरम्यान, लेमनग्रास पासून बनविलेलया चहाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. लेमनग्रास चहा मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो, ज्यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. उलटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. लेमन टी वजन सुद्धा नियंत्रणात राहते. मध मिसळून लेमनग्रास चहा प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
लेमनग्रास चहा कसा बनवायचा
लेमनग्रास चहा बनवण्यापूर्वी लेमनग्रास कापून चांगले स्वच्छ धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चिरलेली लेमनग्रास घाला. ५ ते ५ मिनिटे चांगले उकळल्यानंतर ते एका कपमध्ये गाळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि मध मिसळून ते एकत्र करून प्या.
लेमनग्रास चहाचे फायदे
लेमन ग्रास पचनक्रिया सुधारते
पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या खूप वाढतात, त्यामुळे या ऋतूत नियमितपणे लेमनग्रास प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, मळमळ आणि गॅसच्या समस्या कमी होतात. या चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात आणि पोटाच्या समस्यांपासून दूर राहतात.
वजन कमी करण्यासाठी
आजकाल वाढते वजन हे अनेक आजारांचे मूळ आहे. लेमनग्रास चहामुळे शरीरातील चरबी कमी होते. हे प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते, ज्यामुळे वारंवार आजार पडण्याचा धोका कमी होतो. हे प्यायल्याने शरीरही डिटॉक्स होते.
कोलेस्ट्रॉल कमी करते
अनेक वेळा जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीय वाढते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लेमनग्रास चहा प्यावा. लेमनग्रासमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो.
त्वचेत चमक
लेमनग्रासमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेला चमक येते.