वार्ताहर / किणये
जनावरांना होत असलेल्या लम्पिस्कीन रोगामुळे तालुक्मयातील बळीराजा अक्षरशः संकटात सापडला आहे. लम्पिस्कीन रोगामुळे तालुक्मयातील शेतकऱयांच्या गाई-बैल आदी जनावरे दगावलेली आहेत. जनावरांना होत असलेल्या संसर्गजन्य आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. लम्पिस्कीनबाबत जनजागृतीची सध्या गरज असून किणये गावात दुर्गामाता दौडच्या माध्यमातून लम्पिस्कीनबाबतचा देखावा सादर करून गावात जनजागृती केली करण्यात आली आहे.
तालुक्मयात नवरात्र उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घटस्थापनेपासून तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून गावातील तरुण वर्ग एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. असे असताना मात्र जनावरांना लम्पिस्कीनचा आजार होऊ लागला असल्याने जनावरे बाळगणाऱया शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
किणये गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर यांच्यावतीने लम्पिस्कीन बाबतचा देखावा सादर करण्यात आला. बाबू मारुती डुकरे यांनी या देखाव्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. मंगळवारी किणये गावात दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिराजवळ हा लम्पिस्कीन देखावा सादर करण्यात आला. या देखावाच्या बाजूला रोग नियंत्रणात कसा आणावा याबाबतचे परिपत्रकही लावण्यात आले होते. हा देखावा पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱयांसह भागातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.
किणये गावात गेल्या आठ दिवसापासून दुर्गामाता दोन मोठय़ा उत्साहात सुरू आहे. मंगळवारी झालेल्या दौडमध्ये तरुण-तरुणी व गावातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता. प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. महिला दौडचे आरती करून स्वागत करीत होत्या. तसेच मंगळवारी सादर करण्यात आलेला लम्पिस्कीनबाबतचा देखावा सर्वांसाठी आकर्षणाचा ठरला. तसेच या माध्यमातून शेतकऱयांना जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.
आज व्याख्यान
शिवप्रति÷ान हिंदुस्थान शाखा किणये यांच्यावतीने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची बुधवार दि. 5 रोजी सांगता करण्यात येणार आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर संपूर्ण गावभर ही दौड फिरून महालक्ष्मी मंदिरासमोर सांगता होणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता कोल्हापूर येथील पराग निटुरकर यांचे व्याख्यान होणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी बुधवारच्या दौडमध्ये सहभागी व्हावे व या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









