मुख्यमंत्री योगी होणार सामील
वृत्तसंस्था / अयोध्या
भगवान श्रीरामाची नगरी असलेल्या अयोयेत आता श्रीराम महामंत्र यज्ञाचे आयोजन होणार आहे. 5 ते 14 ऑक्टोबरपर्यंत हा धार्मिक विधी चालणार असून यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सामील होऊ शकतात. पहिल्या दिवशी 1100 कलशांच्या स्थापना केल्यावर यात्रा काढली जाणार असून यात लाखो रामभक्त सामील होतील. 540 रामभक्तांकडून दररोज राममंत्रांचा जप केला जाणार आहे.









