Former Home Minister Anil Deshmukh granted bail
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल अकरा महिन्यांनी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड जेलमध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.
न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत.
सावंतवाडी /प्रतिनिधी









