ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मला अशा धमक्यांचं अप्रूप नाही. धमक्यांचा माझ्यावर परिणाम होणार नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
शिंदे म्हणाले, यापूर्वी अनेक वेळा नक्षल तसेच देश विघातक शक्तींनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. हे मला काही नवीन नाही. मी जनतेमधला माणूस आहे आणि मला जनतेमध्ये जण्यापासून रोखू शकत नाही. माझ्यावर धमक्यांचा परिणाम झालेला नाही आणि होणार नाही. पोलीस याची काळजी घेत आहेत.’
अधिक वाचा : गांधीविचार विसरून चालणार नाही : सुशीलकुमार शिंदे
शिंदे यांना आत्मघाती स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक धमकीचा निनावी फोन देखील आला होता. सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.