Maharashtra Politics : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत ही भाजपाच्या समर्थनार्थ सातत्याने बोलत असते. २०२४ साली ती मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा आहेत. खासदार हेमा मालिनी यांनी याचविषयी एक विधानही केलं होतं. उद्या राखी सावंत जरी उभी राहिली तरी मथुरेतली जनता तिलाही निवडून देतील, असा टोला त्यांनी कंगना रणौतला लगावला आहे. २०२४ ला लोकसभेच्या निवडणुकीला कंगना उभं राहणार असल्याच्या चर्चांमध्ये होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाने त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यावेळी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिलं होतं की, यशस्वी होण्याची ही एक प्रेरणादायी कथा आहे. रिक्षा चालवण्यापासून देशातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्त बनण्यापर्यंतचा प्रवास…तुम्हाला शुभेच्छा सर.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









