10 कोटी होणार खर्च, माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांकडून पाहणी
वार्ताहर /केपे
केपेत जे गरजेचे आहे त्याला सदैव प्राधान्य दिलेले असून केपे पालिकेच्या क्षेत्रातील पार्किंग व्यवस्था मार्गी लागावी याकरिता 10 कोटी रु. खर्चाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले. या कामाची सुरुवात झाल्यानंतर केलेल्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, चेतन हळदणकर, गणपत मोडक, जि. पं. सदस्या संजना वेळीप, संजय वेळीप व इतर हजर होते.
गेल्या अनेक वर्षांपासून केपे पालिका क्षेत्रात पार्किंगची समस्या भेडसावत असल्याने मी उपमुख्यमंत्री होताच या कामाला. चालना दिली होती व निवडणुकीच्या पूर्वी त्याची पायाभरणी केली होती. त्या कामाला आता सुरुवात झाली आहे. केपे पालिकेसमोरून जाणाऱया पारोडा कालव्याची जागा भराव घालून भरून काढून तेथे ही पार्किग व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 3 हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होऊन केपेतील पार्किंग समस्या सुटण्यास मदत होईल, असे कवळेकर यांनी सागितले.









