शिवतीर्थावर आंदोलन करणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते
सातारा प्रतिनिधी
जिस देश से प्यार नही, उसे जीने का अधिकार नही, तुम जाती वाद से तोडोगे, हम राष्ट्रवादचे जोडेंगे, जाती वाद ना, प्रांत वाद, सबसे उपर राष्ट्रवाद असे घोषवाक्य लिहिलेले फलक हाती घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने वंदे मारतम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत पीएफआय या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी करत शिवतीर्थावर जोरदार निदर्शने केली.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी मीडियाशी बोलताना म्हणाले, सध्या देशभरात एनआयएने पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या निषेधार्थ पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मार्चा काढला होता. त्या मोर्चात काही देशविघातक मंडळींनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. अशा संघटनेचे समर्थन करणाऱया पिल्लावळींकडून चुकीचे वर्तन घडत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे पीएफआय या संघटनेवर बंदी आणावी, ज्यांनी देश विरोधात घोषणा दिल्या त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार भारत माता की जय, वंदे मातरम्, अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ांचे दर्शन घेवून त्यांच्याही नावाचा जयघोष कार्यकर्त्यांनी केला.